Ratan Tata (Photo Credit - Wikimedia Commons)

Who is Mohini Mohan Datta: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता.    दरम्यान, रतन टाटा यांनी निधनापूर्वी  एक-दोन कोटी नव्हे, तर ५०० कोटी रुपये एका व्यक्तीच्या नावे केले आहे.  याचा खुलासा आता झाला आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालमत्तेबाबत नुकत्याच उघडण्यात आलेल्या इच्छापत्रानुसार त्यांनी आपल्या उर्वरित मालमत्तेचा एक तृतीयांश भाग त्यांचे मोहिनी मोहन दत्ता (वय ७४) यांना दिला आहे. उर्वरित मालमत्तेत बँक खात्यात जमा झालेली रक्कम आणि वैयक्तिक वस्तूंच्या लिलावातून मिळणाऱ्या रकमेचा समावेश आहे.रतन टाटा यांच्या इच्छापत्रात मोहिनी मोहन दत्ता यांचा उल्लेख टाटा कुटुंबासाठी आश्चर्यकारक आहे, कारण ते कुटुंबातील सदस्य नाहीत.

चला तर जाणून घेऊया, कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता 

रतन टाटा आणि मोहिनी मोहन दत्ता यांचे नाते जवळपास ६० वर्षे जुने आहे. १९६० च्या दशकात रतन टाटा २४ वर्षांचे असताना जमशेदपूरच्या डीलर्स हॉस्टेलमध्ये त्यांची पहिली भेट झाली. तेव्हापासून या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. जमशेदपूरयेथील ट्रॅव्हल बिझनेसमन मोहिनी मोहन दत्ता या  त्यांचा कुटुंबासोबत 'स्टॅलियन' नावाची ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते, जी २०१३ मध्ये ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये विलीन झाली. या विलीनीकरणानंतर दत्ता कुटुंबाचा स्टॅलियनमध्ये ८० टक्के, तर टाटा इंडस्ट्रीजचा २० टक्के हिस्सा होता. मोहिनी मोहन दत्ता यांनी टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.

इच्छापत्रात मोहिनी मोहन दत्ता यांच्या वाट्यात बँक खात्यात जमा झालेली रक्कम आणि वैयक्तिक वस्तूंच्या लिलावातून मिळालेल्या पैशांचा समावेश आहे. दत्ता यांनी हा वाटा स्वीकारला असला तरी त्यांना सुमारे ६५० कोटींची अपेक्षा आहे.