Telangana: रक्षाबंधन निमित्त भावाच्या घरी जात असताना, बसमध्ये एका गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला. वेळीच कंटक्टर आणि बसमध्ये असलेल्या एका नर्सने महिलेची मदती केली. ही घटना तेलंगणा येथील राज्य संचालित बसमध्ये घडली. बसमध्ये उपस्थित असलेल्या मार्ग परिवहन महामंडळच्या कंडक्टरने गर्भवती महिलेची मदत केली. (हेही वाचा- मुरादाबादमध्ये नर्ससोबत क्रूरता! डॉक्टरला ओलीस ठेवून बलात्कार, रुममध्ये नेणाऱ्या 2 वॉर्ड बॉयनाही अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, गडवाल वानपर्थी मार्गावर प्रवास करत असताना एक गर्भवती महिला प्रवाशाला प्रवासादरम्यान प्रसूती वेदना झाल्या. संध्या असं गर्भवती महिलेचे नाव आहे. याची माहिती मिळताच, भारती नावाच्या कंडक्टरने ड्रायव्हर आणि प्रवाशांना सावध केले. महिलेची तातडीने मदत करण्यात आली. वेळीच बस थांबवण्यात आली. महिलीच्या मदतीसाठीसाठी बसमध्ये असलेल्या नर्सने मदत केली.
A #Female #conductor #G.Bharti of #Vanaparthi Dipona who #delivered a pregnant #woman in a @TGSRTCHQ bus and showed #humanity
under the @tgsrtcmdoffice leadership 👌👏#OperationMatrishakti #WeServeAndProtect#MatriShakti pic.twitter.com/gJJLjZvSyM
— Sunil Veer (@sunilveer08) August 19, 2024
या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. नर्स आणि महिला कंडक्टरने वेळीच मदत केल्याबद्दल नेटकऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. महिलेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, बाळ आणि आई दोघांची प्रकृती स्थिर आहे. TGSRTC अधिकृत अंकाऊटवरून महिलेचा आणि बाळाचा फोटो पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये लिहल्या प्रमाणे, राखीच्या सणावर TGSRTC महिला कंडक्टरने बसमध्ये गर्भवती महिलेची प्रसूती करून माणुसकी दाखवली.