Weather Update: महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होताच पावसाने देखील अचानक हजेरी लावली आहे. देशभरात अनेक ठिकाणी पावसाने झोडपले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने इतर राज्यात देखील पाऊस पडला. गेल्या पाच दिवसांपासून वातावरणात चांगलाच बदल होताना दिसत आहे. ठिकठिकाणी पावसाने हैराण केलं आहे. राज्यात मराठवाडा, कोकण याभागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पाहायला मिळाला आहे. पुढील काही तासांत या भागात देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या राज्यात पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून फक्त महराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार, १४ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकर या किनारपट्टीच्या प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कराईकलच्या किनारपट्टीच्या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या कुडुलोर जिल्ह्यात देखील पाऊस असणार आहे.
कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी, शिवगंगा, पेरांबलूर, अरियालूर, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यांत आणि पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचीसह विजांच्या कडकडाटीसह पावसाची शक्यता आहे. कांचीपुरम जिल्ह्यांमध्ये काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.