Weather Update Of Maharashtra: नोव्हेंबर महिन्यात खरे तर थंडी (Winter) असते. हे दिवस पावसाचे नसतात. पण अलिकडील काळात ऋतुमानात मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आहेत. ज्यामुळे उन्हाळ्या पाऊस, पावसाळ्यात ऊन आणि थंडीत, उन-पाऊस असा खेळ पाहायला मिळत आहे. राज्यात आताही पुढच्या 24 तासांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा या पावसासाठी प्रमुख कारण ठरेल. परिणामी राज्यात विविध ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचाही कडकडाट पाहायला मिळेल. मेघगर्जनेसह राज्यातील विविध ठिकाणी पर्जन्यवृष्टी होईल. आयएमडीने वर्तवलेला अंदाज काही ठिकाणी जाणवूही लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्य स्वरपापात पावसाच्या सरी बरल्या आहेत.
राज्यात अद्याप पुरेशा प्रमाणात थंडी वाढली नाही. मात्र, पुढच्या काहीच दिवसांमध्ये थंडीचा कडाका जोर पकडू लागेल. खास करुन नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीचे प्रमाण वाढू शकते, असे आयएमडी सांगते.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज म्हणजेच 13 नोव्हेंबर 2023 रोजी पावसाची शक्यता आहे. शिवाय रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पर्जन्यवृष्टी आढळून येईल. कोकण किनारपट्टी, मुंबई पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाच्या सरी तुरळक बरसल्या. अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ पाहायला मिळाले. तर काही भागात मात्र कडाक्याच्या उन्हाचे चटके पाहायला मिळाले.
देशभरामध्ये पाऊस आणि थंडी
आयएमडीने सबंध देशभरातील हवामानाचा अंदाज व्यक्त करताना म्हटले आहे की, देशभरातील विविध राज्यांमध्ये कडाक्याची थंडी वाढली आहे. खास करुन पश्चिम हिमालयीन भागात बर्फवृष्टी झाल्याने देशातील इतर भागातील वातावरणावर त्याचा परिणाम पाहायाल मिळतो आहे. वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. परिणामी राजधानी दिल्लीती तापमानही घटते आहे. दिवाळीदरम्यान, वातावरणात प्रदुषणही पाहायला मिळत आहे. खास करुन मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये हवेची गुणवत्ता पातळी कमालिची घसरली आहे. न्यायालयाचे आदेश असतानाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केल्याने आगोदरच खालावलेली हवेची गुणवत्ता आणखी खालावली.
पर्यावरण बदलाचे धक्के
दरम्यान, जगालाच पर्यावरण बदलाचे धक्के बसत आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. त्यामुळे पाठिमागील काही दिवसांपासून भारतातील ऋतूमानही मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. अनेकदा अवकाळी पाऊस, दुष्काळ, थंडी यांचे कालचक्र बदलल्याने त्याचा शेती, नागरिकांचे आरोग्य आणि नैसर्गिक साखळीवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना दिसून येत आहे.