Weather Forecast Tomorrow: ईशान्य भारत वगळता संपूर्ण देशात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भूस्खलन आणि पूर आल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) ३ ऑगस्टचा अंदाज जाहीर केला आहे. IMD ने सांगितले की, उद्या पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात येत्या ३ ते ४ दिवसात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे.भारतीय वेळेनुसार आज सकाळी 5:30 वाजता, गुजरात, पश्चिम बंगाल आणि लगतच्या झारखंडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले,ज्यामुळे पुढील 24 तासांत झारखंड आणि लगतच्या भागांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. हे देखील वाचा: IND vs PAK, Champions Trophy 2025: क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमनेसामने
1) Under the influence of Low Pressure area, isolated extremely heavy rainfall likely over Sub-Himalayan West Bengal & Sikkim, Bihar, Jharkhand, Chhattisgarh on 02nd; Madhya Maharashtra, East Madhya Pradesh on 02nd & 03rd; pic.twitter.com/WWaAcqBFDV
— India Meteorological Department (@Indiametdept) August 2, 2024
झारखंडमध्ये दाबाचे क्षेत्र तयार
A low pressure area formed over GWB and adjoining Jharkhand in the morning 0530 hrs IST and persisted over the same region at 0830 hrs IST of today, It is likely to move west-northwestwards and intensified into a depression over Jharkhand and neighbourhood during next 24 hours. pic.twitter.com/YuTGbujHc8
— India Meteorological Department (@Indiametdept) August 2, 2024
स्कायमेटनेही ३ ऑगस्टचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, पुढील २४ तासांत झारखंड, उत्तर छत्तीसगड आणि ईशान्य मध्य प्रदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम, आसाम, पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर तेलंगणा, दक्षिण आणि पश्चिम राजस्थान, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, किनारी कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
ईशान्य भारत, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तर राजस्थान, पंजाबचा काही भाग, हरियाणा, मराठवाडा, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. लडाख, पंजाबचा पश्चिम भाग, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकात हलक्या पावसाची शक्यता आहे.