BIhar viral video, PC twitter

Bihar News: बिहारमधील (Bihar) सरकारी शाळांची अवस्था दयनीय आहे जिथे पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे छत गळत असतानाही विद्यार्थ्यांना वर्गात छत्री धरून बसावे लागते. अमित मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे शाळांमधील ही लाजिरवाणी स्थिती समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे कार्यकर्ते मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ (Video) तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे बिहारच्या शैक्षणिक बाबींवर प्रश्न चिन्ह उभा राहतो.

विद्यार्थी वर्ग खोलीत छत्री धरून गळणाऱ्या छतापासून बचाव करताना दिसतात तर शिक्षक बोर्डवर नोट्स लिहितात. मालवीय यांनी ट्विट केले.या व्हिडिओला मोठ्या संख्येने प्रतिसाद देताना, INC चे राज्य समन्वयक, अधिवक्ता अनुज शुक्ला यांच्यासह नेटिझन्सनी सरकारला या परिस्थितीची दखल घेऊन बिहारच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांमधील उणीवा दूर करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे.

नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून भरपूर कंमेट केल्या आहे. सरकराला या परिस्थितीचा दखल घेण्यास सांगितले आहे. तर काहीनी ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे सांगितले आहे.