भजन सम्राट विनोद अग्रवाल यांचे निधन; राधा-कृष्णाचे भजन गाण्यासाठी ठरले होते लोकप्रिय
विनोद अग्रवाल (Photo Credits: Instagram)

भजन सम्राट विनोद अग्रवाल यांचे आज सकाळी मथुरा येथे निधन झाले आहे, ते 63 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते छातीतील दुखण्याने त्रस्त होते. रविवारी त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र हळू हळू त्यांच्या प्रत्येक अवयवाचे कार्य थांबत गेले. शेवटी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

विनोद अग्रवाल यांचा जन्म 6 जून 1955 साली दिल्ली येथे झाला. अतिशय कमी वयातच ते हार्मोनियम वाजवायला शिकले होते. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली. घरातल्या भक्तीमय वातावरणामुळे पुढे ते राधा-कृष्णाचे भजन गाण्यासाठी लोकप्रिय ठरले. त्यांनी आत्तापर्यंत विविध देशांत 1500 पेक्षा जास्त लाईव्ह शोज केले आहेत.

भजन गाताना कित्येकवेळा विनोदजींच्या डोळ्यात अश्रू आलेले लोकांनी पहिले आहेत. भजन गाताना ते मधे उर्दू शायरी गात असत आणि हीच त्यांच्या भजनाची खासियत होती.