Vinesh Phogat, Bajrang Punia to Join Congress: हरियाणा विधानसभा निवडणुकीची 2024 (Haryana Assembly Election 2024) ची लढत रंजक बनली आहे. निवडणुकीला महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशातच आता कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia)आणि विनेश फोगट (Vinesh Phogat) शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress) मध्ये प्रवेश करणार आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास दोन्ही पैलवान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी गेल्या गुरुवारी दिल्लीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. तेव्हापासून दोघेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. (हेही वाचा -Vinesh Phogat, Bajrang Punia Meet Rahul Gandhi: विनेश फोगट, बजरंग पुनिया यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट)
बजरंग आणि विनेश यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट -
Wrestler @BajrangPunia & @Phogat_Vinesh to join congress today at New Delhi. pic.twitter.com/Zx0VK5ORyc
— Akashdeep Thind (@thind_akashdeep) September 6, 2024
हरियाणा निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीची बैठक होत आहे. अजय माकन, भूपेंद्र हुडा या बैठकीला पोहोचले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचीही नावे असू शकतात, अशी अटकळ बांधळी जात आहे. (हेही वाचा; Haryana Assembly Election 2024: काँग्रेसने 34 उमेदवार केले निश्चित, 22 विद्यमान आमदारांच्या नावांचाही समावेश; 'या' जागेवरचा पेच कायम)
आज संध्याकाळी काँग्रेसच्या सीईसी बैठकीत जागांवर पुन्हा चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम झालेल्या 66 जागांवरही पुन्हा चर्चा होणार आहे. गुरुवारच्या बैठकीत कुमारी शैलजा यांनी त्यांच्या वतीने 90 नावांची यादी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी शैलजा, भूपेंद्र हुड्डा आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना त्यांच्या समर्थकांना जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. काँग्रेसच्या सर्व सर्वेक्षणानुसार हरियाणात सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश येत असल्याचे चित्र आहे.