भारतात बँकेचे पैसे लाटून परदेशात पळून गेलेल्या विजय माल्याच्या (Vijay Mallya) प्रत्यार्पणावर 14 मे रोजी यूके कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे. त्यानंतर आता विजय माल्याला भारतात आणले जाणार आहे. मुंबईत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. तपास यंत्रणांच्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माल्याचे विमान लवकरच भारतात येणार आहे. माल्या मुंबईत पोहोचल्यावर त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी विमानात माल्यासोबत असतील. जर माल्या दिवसा भारतात पोहोचला तर त्याला सरळ विमानतळावरून कोर्टात नेण्यात येणार आहे.
किंगफिशर एअरलाईन्सचा मालक असलेल्या विजय माल्याने देशातील 17 बँकांमधून घेतलेल्या पैशांपैकी तब्बल 9 हजार कोटी रुपये फेडणे बाकी आहे. तो 2 मार्च 2016 रोजी भारत सोडून ब्रिटेनमध्ये पळून गेला होता. भारतीय तपास यंत्रणांनी यूके कार्टाकडे माल्याचे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली होती. यूके कोर्टाने ऑगस्ट 2018 मध्ये माल्याच्या याचिकेवर सुनावणी करत भारतीय तपास यंत्रणांना त्याला ज्या तुरुंगात ठेवणार त्याची संपूर्ण माहिती मागितली होती. जिथे प्रत्यार्पणानंतर माल्याला ठेवले जाईल. तेव्हा तपास यंत्रणांनी मुंबईत असलेल्या ऑर्थर रोड तुरुंगातील एका सेलचा व्हिडिओ यूके कोर्टाला दाखवला होता. जिथे माल्याला भारतात आणल्यानंतर ठेवले जाईल. एजंसींनी तेव्हा यूके कोर्टाला आश्वासन दिले होते की, माल्याला 2 मजली ऑर्थर रोड तुरुंग परिसर आतून खूप सुरक्षित बॅरकमध्ये ठेवले जाईल. हे देखील वाचा- भारत सरकारकडून व्हिसा, प्रवास निर्बंधामध्ये शिथिलता; परदेशातील व्यावसायिक, आरोग्यसेवा कर्मचारी, तंत्रज्ञ व इतर तज्ञांना देशात प्रवासाची परवानगी
ऑर्थर रोड जेलमध्ये अंडरवर्ल्डशी निगडित अनेक कुख्यात आरोपींना म्हणजेच अबू सालेम, छोटा राजन, मुस्तफा दोसाला ठेवले गेले. 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पण ऑर्थर तरुंगात ठेवले गेले होते. तर शीना बोरा हत्येकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि पंजाब नॅशनल बँकेचे 13 हजार 500 कोटी रुपये बुडवणाऱ्या विपुल अंबानीला पण याच तुरुंगात ठेवले गेले आहे.