25 मेपासून भारतात घरगुती विमान सेवा सुरू झाली आहे, त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International Flights) सुरु होणार आहेत. ही जरी व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे नसली, तरी काही कामानिमित्त परदेशात असणाऱ्या लोकांना (Foreign Nationals) भारतामध्ये येण्यास मदत होणार आहे. लॉक डाऊनमुळे अनेक भारतीय व्यापारी प्रतिनिधी परदेशातून देशात येण्यास असमर्थ आहेत, ज्याचा परिणाम येथील कामकाजावर होत आहे. या परिस्थितीत सरकारने अशा परदेशी नागरिकांना काही नियमांसह चार्टर्ड प्लेनमधून भारतात येण्यास मान्यता दिली आहे. हा आदेश गृह मंत्रालयाने जारी केला आहे.
सरकारने काही श्रेणींसाठी व्हिसा आणि प्रवासी निर्बंधामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत परदेशी व्यावसायिक, आरोग्य संशोधक, आरोग्य सेवा व्यावसायिक, अभियंता आणि तंत्रज्ञ किंवा इतर तज्ञांसाठी आहेत. गृह मंत्रालयाच्या फॉरनर विभागाने सोमवारी सांगितले की, व्यावसायिक व्हिसावर चार्टर्ड प्लेनमधून (B -3 व्हिसा वगळता जो क्रीडा क्षेत्रासाठी असतो) व्यापारी भारतात येऊ शकतात.
परदेशातून सध्या दोन प्रकारची विमाने भारतात येण्यास आणि जाण्यास परवानगी आहे. आर्थिक क्रियाशीलता कायम राखण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडू नये यासाठी, कार्गो विमानाची वाहतूक चालू आहे व यासाठी कोणतेही बंधन नाही. याशिवाय कोणासही DGCA ची परवानगी मिळाली असेल तर, त्या विमानासही प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या लोकांना भातामध्ये येण्यास, एखाद्या मान्यताप्राप्त आरोग्य सेवा सुविधा, भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा नोंदणीकृत औषधनिर्माण कंपनीच्या पत्राची आवश्यकता आहे. (हेही वाचा: Coronavirus: कोरोना व्हायरस संकट काळात पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमधून 42 कोटी नागरिकांना 53,248 कोटी रुपयांची मदत)
एखाद्या परदेशी कंपनीचे भारतात युनिट असल्यास परदेशी अभियंते, व्यवस्थापक, तज्ञ देखील भारतात जाऊ शकतात. यात सर्व प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच जर भारतात परदेशी मशीन स्थापित केले गेले असेल आणि त्यामध्ये काहीतरी समस्या उद्भवल्यास, त्यासाठी मेकॅनिकला परदेशातून येण्यास परवानगी असणार आहे.