Migrant workers (Representational Image | Photo Credits: IANS)

Pradhan Mantri Garib Kalyan Package: पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) च्या माध्यमातून 2 जून 2020 पर्यंत आतापर्यंत 42 कोटी लाभार्थींना 53,248 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही मदत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपात देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ही माहिती बुधवारी (3 जून 2020) दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 26 मार्चला कोविड 19 (COVID-19) मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात समाजातील अनेक घटकांवर परीणाम झाला. यात गरीब आणि दुबळ्या घटकांचा समावेश आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी 1.7 लाख कोटी रुपयांच्या पीएमजीकेपी पॅकेजची घोषणा केली होती.

पॅकेजच्या माध्यमातून सरकारने महिला आणि गरीब नागरिक तसे शेतकरी यांच्यासाठी मोफत अन्न आणि रोख मदत करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत केंद्र सरकारने पंतप्रदान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 8,488 कोटी रुपये हस्तांतरीत केले आहेत. त्याशिवाय 8.58 कोटी मोफत उज्ज्वला सिलिंडरही वितरीत केले आहेत. जे एकूण 9.25 कोटी सिलिंटर बुक करण्यात आली आहेत. पॅकेजच्या माध्यमातून सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी 30 जून पर्यंत तीन महिने मोफत घरगुती गॅस लिलिंडर वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्र्यानी सांगितले की, 2 जून 2020 पर्यंत सरकारने 59.23 लाख ईपीएफओ खातेधारक कर्मचाऱ्यांना लाभ पोहोचविण्यासाठी 895 कोटी रुपयेही जारी करण्यात आले आहेत. यात सरकारने तीन महिन्यांच्या काळासाठी कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांच्या संपूर्ण 24% पीएफएमएस अंशदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सरकारने पीएम-किसानयोजनेतील 16,394 कोटी रुपयांचा पहिला टप्पाही वितरीत केला आहे. या टप्प्यात 8.19 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली.ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा करण्यात आले.

ट्विट

सरकारने 2 जून पर्यंत महिला जन धन खात्यांवर 20,344 कोटी रुपयांचे वितरण केलेआहे. 20.05 कोटी महिला जन धन खातेधारकांना दुसऱ्या टप्प्याच्या रुपात 10,029 कोटी रुपये रक्कम देण्यात आली. याशिवाय सरकारने सुमारे 2.81 कोटी वृद्ध, विधवा, दिव्यांगांसाठी 2,814 रुपयेही निर्धारीत केले आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेच्या माध्यमातून निश्चित रकमेच्या रुपात 500 रुपयांचा पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात 500 रुपये मिळाले. सरकारने 100 ओळख पटलेल्या लाभार्थ्यांसाठी प्रत्येक टप्प्यात 1,407 रुपये दिले. यासोबतच 2.3 कोटी बांधकाम मजूरांना आतापर्यंत 4,313 कोटी रुपये रुपये वितरीत करुन आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.