Ghulam Nabi Azad Tests Positive For COVID19: काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करुन दिली माहिती
Ghulam Nabi Azad (Photo Credit: IANS)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संकटाने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांपासून तर अनेक व्हीआयपी कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यातच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत गुलाम नबी आझाद यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. यामुळे पुढील 14 दिवस ते होम क्वारंटाईन राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच गुलाम नबी आझाद यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्राथनादेखील केली जात आहे.

गुलाम नबी आझाद यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आली आहे. मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे” असे आवाहनही त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ट्विटरने लॉन्च केले Search Prompt

गुलाम नबी आझाद यांचे ट्विट-

याआधीही कॉंग्रेसचे बऱ्याच नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. माहितीनुसार, काँग्रेसच्या वरिष्ठ नेते मोती लाल बोरा, अभिषेक मनु सिंघवी, तरूण गोगाई आणि आपीएन सिंह यांच्यासह काँग्रेच्या अनेक नेते कोरोनाच्या जाळ्यात अडकले होते.