Vande Bharat Train Makes Emergency Stop (PC - Twitter)

Vande Bharat Train Makes Emergency Stop: उदयपूर-जयपूर (Udaipur-Jaipur) वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Train)च्या दक्ष लोको पायलट (Loco Pilots) ने आज हायस्पीड ट्रेन रुळावरून घसरण्यापासून वाचवल्याने संभाव्य अपघात टळला. अंदाजे 09:55 वाजता, गांगार-सोनियाना सेक्शनमध्ये रुळांवर धोकादायक अडथळा निर्माण झाल्यामुळे ट्रेन अचानक थांबली. ही घटना चित्तौडगड जिल्ह्यातील एसएचओ गंगार यांच्या हद्दीत भिलवाडा येथील रेल्वे संरक्षण दल (RPF) चौकीच्या अधिकारक्षेत्रात उघडकीस आली. काही अज्ञात व्यक्तींनी ट्रॅकवर दगड आणि गिट्टी ठेवली होती. जाणूनबुजून केलेल्या या घटनेमुळे मोठा अपघात झाला असता.

सुदैवाने, कर्तव्यावर असलेल्या दक्ष लोको पायलटांनी वेळीच अडथळे शोधून काढला आणि आपत्कालीन ब्रेक लावून मोठा अपघात टाळला. या घटनेची माहिती मिळताचं वरिष्ठ विभाग अभियंता आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा - Ghaziabad: 'जय माता दी' स्टिकर असलेल्या वाहनाला दंड ठोठावल्याने हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, Watch Video)

रेल्वे सुरक्षा दल आणि जिल्हा पोलीस या दोन्ही घटनांचा तपास सक्रियपणे करत आहेत. जीव धोक्यात आणणाऱ्या आणि रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या या कृत्याला जबाबदार असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.