Vande Bharat Express

Vande Bharat Express: नवी दिल्लीहून (New Delhi) वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधून (Vande Bharat Express)  प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने प्रवासादरम्यान त्याला शिळे जेवण दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर जेवणाचे ट्रे परत घेण्याची विंनीती करत आहे. या प्रकरणी प्रवाशांने X वर व्हिडिओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये प्रवाशाने त्याची तक्रार लिहली आहे.(हेही वाचा- बेळगावी येथील शालेय पोषण आहारात निष्काळजीपणा! दुधात सापडलं 'असं काही')

पोस्टमध्ये दोन व्हिडिओ देखली आहे. या पोस्टमध्ये त्याने रेल्वे विभागाला टॅग केले होते. त्यानंतर लगेच रेल्वे विभागाकडून उत्तर आले आहे. आकाश केशरी असं तक्रारदाराचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, मी NDLS ते BSB पर्यंत 22416 च्या प्रवासात आहे. आता जे अन्न दिले जात होते त्यातून दुर्गंदी येत आहे. ते अन्न खाण्या योग्य नाही, कृपया माझे सर्व पैसे परत करा. हे विक्रेते वंदे भारत एक्सप्रेसचे ब्रँड नाव खराब करत आहेत,” असंं त्याने पोस्टमध्ये लिहलं आहे.

या वर उत्तर म्हणून , IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने देखील प्रतिक्रिया दिली, “सर, तुम्हाला आलेल्या असमाधानकारक अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सेवा पुरवठादारावर योग्य तो दंड ठोठावण्यात आला आहे.