Uttar Pradesh Accident: बसला धडकल्याने भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, 15 जखमी
Accident (PC - File Photo)

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात देववंगमध्ये देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला बसने धडक दिली आहे.  या अपघातात 15 जण जखमी झाले आहे. सद्या त्यांच्यावर शासकिय रुग्णालायत उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. यात 6 जणांची प्रकृती गंभीरअसल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारचे पीडब्ल्यूडी राज्यमंत्री कुंवर ब्रिजेश सिंग जखमींना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी बस चालक आणि कंडक्टरला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माता शांकभरी देवीच्या दर्शनासाठी मुढफ्फरनगर जिह्यातील जनसठ पोलिसा स्टेशनच्या राजपूरा गावातून १५ लोक ट्रॅक्टर- ट्राॅलीतून जात होते. सहारनपूर मुढफ्फरनगर राज्य महामार्ग ५० वर असलेल्या मॅपल्स अकादमीजवळ त्याचा ट्रॅक्टर पोहोचताच भरधाव वेगाने येणाऱ्या बसने त्याला मागून जोरदार धडक दिली. बसची धडक बसल्याने ट्रॉली रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. अपघातानंतर ट्रॉलीतून प्रवास करणाऱ्या भाविकांमध्ये आरडाओरडा झाला. अपघाताची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये १५ जणांचा समावेश आहे. जखमींना पाहण्यासाठी राज्यमंत्री कुंवर ब्रिजेश सिंह देवबंद रुग्णालयात पोहोचले. योग्य उपचाराचे सुचनी देण्यात आली आहे.  देवबंदचे एसडीएम आणि सीओ यांनी अपघाताची माहिती गोळा केली.