Uttar Pradesh Shocker: पॅरामेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याने इटावा येथे खळबळ, दोघांवर गुन्हा दाखल
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील इटावा येथे गुरुवारी एका पॅरामेडिकल विद्यार्थ्यींचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला आला आहे. या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. प्रिया मित्रा असे मृत विद्यार्थींची नाव आहे. इटावा येथील सैफई मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाइफरी (ANM) शिकत होती. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे. आरोपी फरार असल्यामुळे पोलिस त्यांचा शोध घेत आहे. हेही वाचा- 22 व्या मजल्यावरून पडून 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, नोएडा येथील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावर सोनई नदीच्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला प्रियाचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात सापडला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्रिया मित्रा हीचा खून झाल्याचे प्राथमिक संशय घेतला आहे. मृतदेहावर मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. तिच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

प्रियाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सैपई मेडिकल कॉलेजचे 1,000 विद्यार्थी ट्रॉमा सेंटरबाहेर जमले होते. पोलिसांनी दोन पुरुषांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना लवकरच पकडले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.प्रिया  मिश्रा यांच्या मृत्यूचा तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तज्ञांचे एक पॅनेल पोस्टमार्टम तपासणी करत आहे. याव्यतिरिक्त, प्रियाच्या हत्येची परिस्थिती समजून घेण्यासाठी अधिकारी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेमुळे शहर हादरले आहे.