Uttar Pradesh Shocker: निष्काळजीपणा! म्हशीच्या शेणामुळे 6 महिन्याच्या बाळाचा वेदनादायक मृत्यू, उत्तर प्रदेशातील विचित्र घटना
Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Uttar Pradesh Shocker: तुम्ही कधी ऐकल आहे का म्हशीच्या शेणामुळे एकाचा मृत्यू होऊ शकतो, अशीच एक विचित्र घटना उत्तर प्रदेशात  (Uttar Pradesh) घडली आहे ज्यामुळे कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे बाळाला जीव गमवावा लागला आहे.राज्यातील महोबामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. म्हशीच्या शेणामुळे सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू (Death) झाल्याची खळबळजनक घटना समोर येत आहे. म्हशीने बाळाच्या तोंडावर शेण केल्याने बाळाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. (हेही वाचा- आठ दिवसांच्या चिमुकलीचा बापाने केली हत्या

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महोबा जिल्ह्यातील कुलपहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सातारी गावात मुकेश जाधव यांच्या घरात ही घडली घडली आहे. काल संध्याकाळी बाळाच्या पाळण्याजवळ घरातील म्हैस बांधण्यात आली होती, त्यानंतर घरातले सर्वेजण शेतात कामाला आणि काही जण इतर कामात गुंतले. सायंकाळच्या वेळीस पाळण्यात असलेल्या बाळाच्या तोंडावर म्हशीने शेण केले.  निरागस मुलाजवळ बांधलेली म्हैस हे त्याच्या मृत्यूचे कारण बनेल असं कोणालाच ठाव नव्हता. दरम्यान तिचा गुदमरून मृत्यू झाला. संध्याकाळी घरात प्रवेश केल्यानंतर बाळाची अवस्था पाहून सर्वांच्या पायाखालील जमीनच सरकली.

डॉक्टरांनी मृत घोषित केले

कसे तरी तोंडावरील शेण काढून बाळाला तात्काळ रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी बाळाला मृत्य घोषित केले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बाळाचा मृत्यू गुदरमरल्यामुळे झाले आहे. मृत्यूची घटना समजताच कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. या घटनेने गावात दुखाचे वातावरण निर्माण झाले आहे.