Shramik Special Trains: नाशिक येथून 845 कामगारांना घेऊन उत्तर प्रदेशसाठी रवाना झालेली पहिली विशेष ट्रेन उद्यापर्यंत लखनऊ येथे पोहचणार; अवनीश अवस्थी यांची माहिती

कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारने सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्राने देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांचे घरी जाण्याचे मार्ग खुले केले आहेत. शहरात अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यातच आज सकाळी नाशिक (Nashik) येथून 845 कामगारांना घेऊन उत्तर प्रदेशसाठी (Uttar Pradesh) रवाना झालेली पहिली विशेष ट्रेन उद्यापर्यंत लखनऊला (Lucknow) पोहचणार, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी (Awanish Awasthi) यांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा लखनऊसाठी ही विशेष ट्रेन लखनऊला रवाना होणार होती. मात्र, काही कारणांमुळे लखनऊला जाणारी ट्रेन स्थगित करण्यात आली होती.

लॉकडाउनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंततराज्य प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनमधून लखनऊ, उत्तर प्रदेश आणि भोपाळ, मध्य प्रदेशात जाण्यासाठी परराज्यांतील कामगार नाशिक रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात आली आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे देखील वाचा-Coronavirus: आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी नौदलाच्या 14 युद्धनौका सज्ज

एएनआयचे ट्वीट-

3 मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याची मुदत संपणार होती. मात्र, केंद्र सरकारने काही राज्यांची मागणी लक्षात घेऊन लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्राने घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी विविध राज्यांनी कामगारांना परत नेण्याच्या मागणीचीही दखलही केंद्राने घेतली. त्यामुळे राज्यांनी विविध राज्यात अडकलेले आपापल्या राज्यातील कामगार, विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत नेण्याचे काम सुरू केले आहे. कामगारांसाठी विशेष गाड्याही रेल्वे मंत्रालयाने सोडल्या आहेत.