Coronavirus: आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी नौदलाच्या 14 युद्धनौका सज्ज

कोरोना विषाणुने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक भारतीय जगातील विविध देशात अडकले आहेत. आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. भारतीय नौदलाने आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी 14 युद्धनौका (Warship) तयार केल्या आहेत. यातील 4 युद्धनौका वेस्टर्न कमांडमध्ये, 4 युद्धनौका पूर्वेकडील कमांडमध्ये आणि 3 युद्धनौका दक्षिणी कमांडमध्ये आहेत, अशी माहिती नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार (Vice Chief Vice Admiral G Ashok Kumar) यांनी दिली आहे.

Coronavirus: आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी नौदलाच्या 14 युद्धनौका सज्ज
प्रतिनिधिक फोटो (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणुने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक भारतीय जगातील विविध देशात अडकले आहेत. आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. भारतीय नौदलाने आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी 14 युद्धनौका (Warship) तयार केल्या आहेत. यातील 4 युद्धनौका वेस्टर्न कमांडमध्ये, 4 युद्धनौका पूर्वेकडील कमांडमध्ये आणि 3 युद्धनौका दक्षिणी कमांडमध्ये आहेत, अशी माहिती नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार (Vice Chief Vice Admiral G Ashok Kumar) यांनी दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील आयएनएस आंग्रे येथे एकूण 38 जणांना कोरोनाची व्हायरसची लागण झाली आहे. यातील 12 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असेही अशोक कुमार यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - मध्य प्रदेश: धक्कादायक! लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र ते लखनौ दरम्यान कॉंक्रिट मिक्सरच्या ट्रक मधून 18 जणांचा प्रवास, पहा घटनेचा व्हिडिओ)

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 37 हजार पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 1218 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2020 04:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).