लॉकडाउनच्या काळात चोरीछुपा प्रवास उघडकीस (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्योगधंद्यांसह अन्य क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. खासकरुन लॉकडाउनचा फटका कामगार वर्गाला बसला असून त्यांचे हातावर पोट आहे. मात्र या कामगार वर्गाने लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थलांतरित कामगार वर्ग विविध मार्गांचा वापर करुन आपल्या घरी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र ते लखनौ असा कॉंन्क्रिटच्या मिक्सर मधून प्रवास करणाऱ्या 18 कामगारांना मध्य प्रदेशात ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

स्थलांतरित कामगारांचे चोरीछुप्या रितिने घरी जाण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासंबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात काही कामगार कॉंक्रिटच्या मिक्सर टॅंकर मधून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार खरच भीतीदायक असून टॅंकर मधील 18 कामगारांना पोलिसांनी त्यामधून बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी इंदोर येथे पकडलेला हा ट्रक पोलीस स्थानकात पाठवला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Lockdown मुळे महाराष्ट्र राज्यातील भिवंडी मधून सायकलवर उत्तर प्रदेशातील मूळ गावी निघालेल्या मजूराचा वाटेतच मृत्यू) 

पहा या घटनेचा व्हिडिओ:

दरम्यान, शुक्रवारी तेलंगणा येथून पायी प्रवास करत काही स्थलांतरित नागरिक नागपूर येथे पोहचले आहेत. मात्र पायी प्रवास करताना त्यांना सरकारकडून कोणतीच मदत न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आम्हाला परिवाराला भेटायची इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशापर्यंतचा हजारो किमीचा प्रवास सायकलवरुन केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाऊ नका असे आवाहन केले आहे. त्याचसोबत त्यांच्यासाठी शेल्टर होमची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा सोय केली आहे.