देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) संभल जिल्ह्यात (Sambhal) घडलेल्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या परिसरात शेतात शौच करण्यासाठी गेलेल्या एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणातील दोन आरोपींपैकी एकाला सोमवारी अटक करण्यात आली आहे. तर, दुसरा आरोपी फरार आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलगी रविवारी रात्री शौच करण्यासाठी शेतात गेली होती. त्यावेळी दोन आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचे गावातील एका मुलाने पाहिले. त्यानंतर पीडिताच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली आहे. ज्यावेळी पीडिताचे घरचे तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहचले. तेव्हा आरोपींनी त्यांना गोळी घालण्याची धमकी आणि घटनास्थळावरून पळून गेले, अशी माहिती पीडिताच्या कुटुबियांनी पोलिसांना दिली आहे. हे देखील वाचा- Kerala Horror: माय-लेकीच्या नात्याला काळिमा! केरळमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आईसह तिघांना अटक
संभलचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) आलोक कुमार जैस्वाल म्हणाले की, कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. भारतीय दंड संहिताच्या कलम 376D आणि पोस्को कायद्यांर्गत दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.