Kerala Horror: माय-लेकीच्या नात्याला काळिमा! केरळमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आईसह तिघांना अटक
Hoshiarpur Rape accused| Representational Image (Photo Credits: File Image)

केरळच्या (Kerala) पठाणमथिट्टा (Pathanamthitta) जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना अरनमुला (Aranmula) शहरात 28 जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईसह अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या आईनेच तिला दोन आरोपींसह त्यांच्या दुचाकीवर एका निर्जनस्थळी पाठवल्याचा आरोप आहे. पिडिताला सध्या बचावगृहात हलवण्यात आले असून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलगी आपली आई आणि सावत्र पित्यासह राहते. परंतु, ती 28 जुलै रोजी घरी परतलीच नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, पीडित मुलगी घरी परतल्यानंतर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणी पाठवले. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली. पीडिताच्या आईनेच तिला दोन जणांच्या दुचाकीवर निर्जन ठिकाणी पाठवल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडिताच्या आईसह अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा- Bihar Shocker: गांजासाठी 50 रुपये देण्यास नकार दिल्याने व्यक्तीने मित्राला भोकसले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिबीन (वय 32) आणि मोहम्मद शिरास (वय, 36) असे दोन्ही नराधमांचे नाव आहेत. या घटनेतील एक आरोपी पीडित मुलीच्या आईचा जवळचा मित्र आहे. मुलीला बचाव गृहात हलवण्यात आल्याची माहिती आहे. पीडिताच्या आईसह तिन्ही आरोपींवर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.