Uttar Pradesh: संपत्तीच्या वादातून माजी संरपचाची हत्या, मुलासह 3 नातवंडांविरोधात गुन्हा दाखल
KILL (File Photo)

संपत्तीच्या वादातून (Property Dispute) एका माजी सरपंचाची (Ex-Village Pradhan) हत्या (Murder) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) जिल्ह्यातील मौ गावात Mau Village) 29 ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाविरोधात आणि नातवंडाविरोधात मांजोला पोलीस ठाण्यात (Manjhola Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

गजराज सिंह (वय, 75) असे हत्या झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी गजराज सिंह यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता. त्यानंतर गजराज यांचा मुलगा धर्मपालने त्याच्या एका नातेवाईकाविरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, प्राथमिक तपासात त्याचा नातेवाईक निर्दोष असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल समोर असता त्यात गजराज यांची गळा आवळून हत्या झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी धर्मपाल ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी आपणच गजराज यांची हत्या केल्याची धर्मपालने कबूली दिली. हे देखील वाचा-Minor Girls Paraded Naked: पाऊस पडावा म्हणून अल्पवयीन मुलींना नग्न करून गावातून फिरवले; Madhya Pradesh मधील धक्कादायक घटना

गजराज सिंह यांनी धर्मपालच्या संपतीशिवाय काही संपत्ती विकली होती. यामुळे धर्मपाल नाराज होता. तसेच आपल्या संपतीच्या काही भाUग गजराज त्यांच्या मुलीला म्हणजेच धर्मपालच्या बहिणीला देतील, अशी भिती आरोपीच्या मनात होती. याच वादातून धर्मपालने गजराज यांचा गळा आवळून हत्या केल्याची कबूली दिली आहे. या गुन्ह्यात धर्मपालचे दोन मुले अनिकेत आणि रजत यांच्यासह पुतण्या अंकीतनेही त्याला मदत केली आहे. त्यांच्याविरूद्ध आयपीसी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.