Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 07, 2025
ताज्या बातम्या
32 minutes ago

UP Shocker: उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादातून पुजाऱ्याची हत्या

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादात एका मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर निर्माण झालेला तणाव पाहता गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली, जाणून घ्या अधिक माहिती

राष्ट्रीय Shreya Varke | May 01, 2024 12:43 PM IST
A+
A-
Death/ Murder Representative Image Pixabay

UP Shocker: उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादात एका मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर निर्माण झालेला तणाव पाहता गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी सांगितले की, अशोक चौबे (60) हे भलुआनी पोलिस स्टेशन हद्दीतील बारीपूर गावात असलेल्या एका मंदिराचे पुजारी असून मंगळवारी रात्री उशिरा त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली.

 पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी पुजारी चौबे यांचा त्याच गावातील हौसला पासवान नावाच्या व्यक्तीसोबत डीजे वाजवण्यावरून वाद झाला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणावरून मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर पासवान आणि त्याच्या साथीदारांनी पुजाऱ्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. डोक्याला मार लागल्याने पुजारी गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पुजारी यांना उपचारासाठी महर्षी देवराह बाबा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी सांगितले की, या घटनेच्या संदर्भात पासवानसह तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे आणि घटनेनंतर निर्माण झालेला तणाव पाहता मंदिर परिसरात तसेच गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Show Full Article Share Now