UP Shocker: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया परिसरात एका उसाच्या शेतात दलित समाजातील एका 13 वर्षीय मुलीता मृतदेह सापडला. सोमवारी या घटनेंमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी येवून तपास सुरु केला. मुलीच्या मृतदेहावर भरपूर जखमा होत्या अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. विकृतपणे तीची हत्या करण्यात आली आहे तसेच मुलीचे डोळे देखील काढण्यात आले आहे. या विकृतहत्ये मुळे गावात मोठी अशांतता पसरली आहे. मुलीच्या आईने आरोप केला आहे की, पोलिसांनी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली नाही.या प्रकरणात पोलीस अधिकारी कायदेशीर कारवाई करतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यांनी गावकऱ्यांनी गावत मोठा गोंधळ घातला आहे. घटनास्थळी आणखी काही पुराव्यासाठी तपासणी चालू आहे.
लखीमपुर खीरी के 13 साल की नाबालिग के साथ हैवानियत गन्ने के खेत में मिला छत विछत शव दरिंदो ने बच्ची की दोनों आँख भी फोड़ी मदरसे से घर आते समय गायब हुई थी छात्रा तिकुनिया थाना क्षेत्र का है मामला @Uppolice @lakhimpurpolice @dgpup @myogiadityanath pic.twitter.com/v8AsGbgFEQ
— Raj B. Singh (@razzbsingh) October 10, 2023