Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात बाह ब्लॉकमध्ये दोन आठवड्यांपुर्वी भटक्या कुत्र्यांनी एका ८ वर्षाच्या मुलीवर हल्ला केला होता. पण उपचाराअभावी तीचा मृत्यू झाला. मुलगी जवळच्या किराणा दुकानात गेली असताना ही घटना घडली. घरी आल्यावर ताबडतोब तीनं पालकांना या घटनेची माहिती दिली, तीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु भटक्यां कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर लगेचच तिला अँटी रेबीज लस (एआरव्ही) दिली गेली नाही.
रविवारी प्रकृती बिघडली नंतर तीला आरोग्य क्रेंद्रात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून डॉक्टरांनी तिला सोमवारी आग्राच्या एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तेथे मुलीला मृत घोषित केले गेले. मुलीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुलीला उपचारा अभावी रिबेजची लागण झाली. कुत्रा चावल्यामुळे किरकोळ जखम झाली होती. मला वाटले काही दिवसात बरे होईल. माझ्या शेजारच्या दुसर्या मुलासोबतही अशीच घटना घडली आहे आणि तो मुलगा ठीक आहे. पण माझ्या मुलाची तब्येत अचानक बिघडू लागली. तिला खूप ताप आला होता आणि बोलता येत नव्हते.
डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे, मुलीला 15 दिवसांनी रुग्णालयात आणले गेले. तीला रिबीजची लागण झाली होती. तीला बोलता येत नव्हतं, दरम्यान तीचा मृत्यू झाला.या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.