Photo Credit- X

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील मैहर (Maihar) जिल्ह्यात भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनिंयत्रीत बसची पार्क केलेल्या डंपरला धडक लागल्याने हा अपघात घडला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर आणखी काही प्रवासी जखमी झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. (हेही वाचा-  कारची पादचाऱ्याला धडक, दोन गटात तुफान हाणामारी, सहा जणांस अटक (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात बसची धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या अपघात 17- 20 प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण परिस्थिती निर्माण झाली.

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरु करत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. पोलिस अधिकाऱ्याने माहिती दिली की, बस प्रयागराजहून नागपूरच्या दिशेने जात होती. अचानक बस अनियंत्रित झाली आणि पार्क केलेल्या डंपरला धडकली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णलायात दाखल केले.