Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Karnataka: कर्नाटकातील हासनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, 7 फेब्रुवारी रोजी एक 20 वर्षीय व्यक्ती फ्लिपकार्टच्या वतीने आयफोन डिलिव्हरी (iPhone Delivery) करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याची हत्या (Murder) करण्यात आली. 20 वर्षीय फ्लिपकार्ट एजंट आयफोन डिलिव्हरी करण्यासाठी ड्युटीवर गेला होता. ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हेमंत दत्ता असे आरोपीचे नाव असून तो आरसेकेरे तालुक्यातील लक्ष्मीपुरम भागातील रहिवासी आहे.

आयफोन डिलिव्हरी करताना दोघांमध्ये पैसे देण्यावरून आणि पार्सल अनबॉक्सिंगवरून वाद झाला. रागाच्या भरात आरोपी दत्ता याने डिलिव्हरी एजंट नाईकचा भोसकून खून केला. यानंतर आरोपींनी मृतदेह एका गोणीत भरून तीन दिवसांनी अंचेकोप्लूजवळ फेकून दिला. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी डिलिव्हरी एजंटच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. (हेही वाचा -Delhi Shocker: भूतबाधाच्या नावाखाली तांत्रिकाचा 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता 2 महिन्यांची गर्भवती)

बरेच दिवस झाले तरी पीडित मुलगा घरी परतली नाही म्हणून त्याच्या भावाने पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर पोलिसांना डिलिव्हरी एजंटचा मृतदेह अर्सिकेरे तालुक्यातील अंचेकोप्लू येथे रेल्वे ट्रॅकजवळ पडलेला आढळला. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान, पोलिसांनी मृताचे फोन कॉल्स ट्रेस केले आणि आरोपींचा शोध घेण्यात यश आले. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी व त्याच्या मित्रांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.