बाईकवर 'पाक की दिवानी' लिहिल्याने गावकऱ्यांकडून तरुणांना मारहाण
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

हिमाचल प्रदेशात दोन तरुणांनी बाईकवर 'पाक की दिवानी' असे लिहिले होते. या कारणावरुन गावकऱ्यांनी दोन बाईकस्वरांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

सोलन जिल्ह्यातील झाडमाजरी गावात दोन बाईकस्वार आले. त्या दोघांच्या  बाईकच्या नंबर प्लेटवर 'पाक की दिवानी' असे लिहिले होते. यामुळे गावकऱ्यांना राग अनावर होऊन त्यांना चोप दिला. त्यानंतर दोघांना पोलिसांकडे देण्यात आले.

पोलिसांनी बाईकस्वरांची तपासणी केल्यावर ते दोघे उत्तर प्रदेशातील असल्याचे समजले. काही कामानिमित्त हे दोघे हिमाचल प्रदेशात आले होते. तर पोलिसांनी दोघांच्या बाईकवर लिहिलेल्या शब्दांचे कारण जाणून घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.