School Van PC TW

Gujarat School Van Video: उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मुलं उत्साहाने स्कूल व्हॅनने शाळेला जात असल्याचा चित्र दिसतत आहे. त्यात गुजरात येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या स्कूल व्हॅनमधून दोन शाळकरी मुली पडल्या आहे. व्हॅनमधून पडल्यामुळे त्या जखमी झाल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया समोर आला आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- भरदिवसा पत्नीचे केले अपहरण, पुण्यातील वाकड येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात शहरातील वडोदरा येथील मांजलपूर परिसरात घटना घडली. ही घटना बुधवारी सकाळी 11.45 च्या सुमारास घडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पांढऱ्या रंगाची स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. व्हॅन रस्त्यावरून जात असताना अचानक मुलींचा मोठा आवाज ऐकू आला.अचानक चालत्या व्हॅनमधून दोन मुली पडल्या. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी घटना पाहताच, घटनास्थळी गर्दी केली.

या घटनेत मुलींना किरकोळ जखम झाली आहे.अपघातस्थळाजवळील लोक जखमी मुलींच्या मदतीसाठी पुढेल आले. घटनेबाबत अनेक पालक संताप व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी चालकाला खडे बोल सुनावले आहे. या घटनेनंतर पालकांनी व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केले आहे. व्हॅनचा मागिल दरवाजा नीट बंद न केल्यामुळे ही घटना घडली आहे.