Gujarat Accident: अहमदाबाद येथे दोन अपघात, तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू, 20 प्रवाशी जखमी
Gujrat Accident PC Twitter

Gujarat Accident: अहमदाबाद येथे शनिवारी लिंबडी अहमदाबाद महामार्गावर दोन वेगवेगळे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पहिला अपघात जनशाली पाटयाजळ खासगी लक्झरी बस आणि डंपर ट्रक यांच्यात धडक झाली आणि भीषण अपघात झाला. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. प्रवाशांनी अपघातानंतर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.( हेही वाचा- बेंगळुरूमध्ये बसने स्कूटरला धडक दिल्याने 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लक्झरी बस आणि डंपर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जीवघेणा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशी जागीच मरण पावले. तर 20 प्रवाशी जखमी झाले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघातस्थळी पोलिस आणि रुग्णवाहिका पोहचली. रुग्णवाहिकेतून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. लिबाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरु केला आहे.

दुसऱ्या अपघातात लिंबडी मॉडेल स्कूलजवळ एकाच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. पोलिस घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. हा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. या दोन्ही अपघातामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.