आयएएस जोडपे (IAS Officer) दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये (Thyagraj Stadium Complex) डॉग वॉकसाठी गेले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) आयएएस दाम्पत्य संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) आणि रिंकू दुग्गा यांची बदली केली आहे. संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांनी त्यागराज स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, संजीव खिरवार यांची लडाखमध्ये आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली आहे. दोघेही 1994 कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. एका प्रशिक्षकाने सांगितले की, पूर्वी आम्ही रात्री 8.30 वाजेपर्यंत प्रशिक्षण घ्यायचो, परंतु आता आम्हाला फक्त 7 वाजता मैदान सोडण्यास सांगितले जाते जेणेकरून अधिकारी आपल्या कुत्र्याला फिरवू शकेल. त्यामुळे आमचे प्रशिक्षण आणि व्यायामाचा दिनक्रम विस्कळीत होत असे.
Tweet
Hours after a news report regarding the misuse of facilities at Thyagraj Stadium by Sanjeev Khirwar & his wife Rinku Dugga, MHA has transferred both the AGMUT cadre IAS officers Sanjeev Khirwar & Rinku Dugga to Ladakh and Arunachal Pradesh from Delhi respectively: MHA order pic.twitter.com/teMHyNPwhw
— ANI (@ANI) May 26, 2022
काय आहे प्रकरण?