फोनवरुन पत्नीला दिला तिहेरी तलाक, सहा जणांवर गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

सरकारने नुकताच तोंडी तिहेरी तलाक विरोधात विधेयक लोकसभेत बिल पास करण्यात आले आहे. त्यानंतर ही महिलेला तिच्या नवऱ्याने फोनवरुन तोंडी तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार घडला आहे.

रामपूर येथील फकरुद्दीन याच्याशी पीडित महिलेचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी महिलेला सासरच्या मंडळींनी माहेरुन पाच लाख रुपये आणि कारसाठी पैसे घेऊन येण्यास सक्ती केली. तसेच सासऱ्याने महिलेसोबत गैरव्यवहार करण्याचा ही प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.

परंतु महिलेला नवऱ्याने तिला माहेरी नेऊन सोडले होते. मात्र महिला सासरी पुन्हा परतल्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेची हकिकत सांगण्यासाठी महिलेने नवऱ्याला फोन केला असता त्याने तिला फोनवरुन तोंडी तिहेरी तलाक दिला. त्यामुळे महिलेने दाखल केलेल्या गुन्हाविरुद्ध पाच जणांवर कारवाई करण्यात येणार आहे.