काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या नकला (Mimicry) करणाऱ्या तरुणाचा एक व्हिडिओ चांगलाच व्यायरल झाला होता. ट्रेन मध्ये खेळणी विकणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ होता. यामध्ये अतिशय वेगळ्या ढंगात नेत्यांची मिमिक्री करून हा तरुण खेळणी विकत होता. मात्र आता रेल्वे पोलीस फोर्सने सुरत येथून या तरुणाला अटक केली आहे. अविनाश दुबे (Avdhesh Dubey) असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा वाराणसी येथील आहे.
ट्रेनमध्ये गैरमार्गाने प्रवेश करणे, रेल्वे प्रवासा दरम्यान आरडओरडा करणे आणि अर्वाच्च भाषा वापरणे यांसारख्या इतरही काही गुन्ह्यांबद्दल या तरुणाला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून 6 मिनिटांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्यात अविनाश दुबे ट्रेनमध्ये खेळणी विकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नकल करताना दिसत आहे. अविनाशच्या नकला करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे सोशल मिडीयावर लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली होती. (हेही वाचा: काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदी सोनिया गांधी यांची नियुक्ती)
याबाबत, आरपीएफचे इंस्पेक्टर ईश्वर सिंह यादव म्हणाले. ‘आम्ही अविनाशला अनधिकृतपणे सामानाची विक्री करण्याच्या गुन्ह्यात पकडले आहे. सुरत येथे अशा प्रकारचे सामान विकताना त्याला ताब्यात घेतले. प्रारंभिक चौकशी नंतर त्याला कोर्टात सादर केले गेले. न्यायालयाने अविनाशला 10 दिवसांचा तुरुंगवास आणि 3500/- रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठवली आहे.