Google Top Trending Searches 2022: गुगलने नुकताच आपला इयर इन सर्च रिपोर्ट 2022 (Year in Search Report 2022) जारी केला आहे. या अहवालात सध्या घडणाऱ्या घटनांशी संबंधित काही लोकप्रिय शोधांचा तपशील शेअर करण्यात आला आहे. या यादीत आणखी एक भारतीय पंतप्रधान मोदींच्या पुढे गेला आहे. गुगलच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये पीएम मोदी गुगल सर्चमध्ये मागे पडले आहेत. भारतातील या वर्षातील टॉप 5 सर्चमध्ये बहुतांश खेळांनी आपले स्थान निर्माण केले आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या यादीत अव्वल स्थानावर आहे. अहवालानुसार, 2022 मध्ये भारतीयांमध्ये भाजपच्या बहिष्कृत नेत्या नुपूर शर्माचा सर्वाधिक वेळा शोध घेण्यात आला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) ला 2022 मध्ये भारतातील लोकांनी सर्वाधिक शोधले होते. लोकांनी आयपीएलबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या क्रमांकावर, लोकांना CoWIN अॅपबद्दल जाणून घ्यायचे होते. लोकांनी त्यांच्या परिसरातील कोरोना लस केंद्र शोधण्यासाठी ते गुगलवर मोठ्या सर्च केले गेले. (हेही वाचा - Google Search 2022: गुगलवर 2022 मध्ये 'ही' नोकरी सर्वाधिक केली गेली सर्च; तरुणांमध्ये आहे याचं क्रेज)
गुगलच्या यादीनुसार, भाजपने बहिष्कृत नेत्या नुपूर शर्माला भारतीयांनी खूप शोधले आहे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती घेण्यात आली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचाही बराच शोध घेण्यात आला आहे. नुपूर शर्मा मोहम्मद साहेबांवर वादग्रस्त वक्तव्य करून खूप चर्चेत आल्या होत्या. त्यांना सर्च करण्याचे हे मुख्य कारण असू शकते.
दरम्यान, बातम्यांच्या बाबतीत, भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आघाडीवर आहे. यानंतर सिद्धू मूसावाला यांच्या हत्येची बातमी सर्वत्र चर्चेत आली होती. क्वीन एलिझाबेथ आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांच्या निधनाच्या बातम्यांचाही मोठ्या प्रमाणावर शोध घेण्यात आला. रशिया-युक्रेन युद्धाशिवाय घरोघरी तिरंगा फडकवण्यातही लोकांनी खूप रस घेतला. अग्निपथ स्क्रीनबाबतही बरीच माहिती मागवण्यात आली होती. (हेही वाचा - Google Year in Search 2022: क्रीडा चाहत्यांनी संपूर्ण वर्षभर गुगल वर सर्वात जास्त काय केले सर्च, घ्या जाणून)
हे चित्रपट ट्रेंडिंग सर्चच्या यादीत -
ब्रह्मास्त्र आणि KGF: Chapter 2 हे चित्रपट ट्रेंडिंग शोधांच्या यादीमध्ये शीर्ष स्थानावर आहेत. या चित्रपटांना जगभरातील ट्रेंडिंग चित्रपटांच्या शीर्ष 10 यादीत देखील स्थान मिळाले आहे. त्यानंतर द काश्मीर फाइल्स, लाल सिंग चड्ढा, हिंदीमध्ये दृश्यम 2, तेलगूमध्ये आरआरआर आणि पुष्पा: द राईज, कन्नडमधील कांतारा, तमिळमध्ये विक्रम आणि इंग्रजीमध्ये Thor: Love and Thunder हे भारतातील टॉप ट्रेंडिंग चित्रपट आहेत.