Karnataka Murder Case: लग्न मोडल्याने तरुणाला संताप अनावर; तरुणीचे अपहरण करून केला शिरच्छेद, गुन्हा दाखल
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Karnataka Murder Case: कर्नाटकातील (Karnataka) कोडागू जिल्ह्यात एका तरुणाने 16 वर्षीय तरुणीचा शिरच्छेद केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारपेठ येथील सुर्लब्बी गावात गुरुवारी ही घटना घडली. प्रकाश (वय, 32) असं आरोपीचं नाव आहे. प्रकाश आणि पीडित तरुणीचं लग्न जमलं होतं. मात्र, 9 मे रोजी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलीचे लग्न थांबवले. अधिकाऱ्यांनी मुलीच्या पालकांना समजावून सांगितल्यानंतर तरुणीचे लग्न मोडले.

लग्न मोडल्याने संतापलेल्या तरुणाने गुरुवारी सायंकाळी मुलीला तिच्या घरातून उचलून निर्जन स्थळी नेले. नंतर तिचा शिरच्छेद करून हत्या केली. एवढेच नाही तर मृतदेह तेथेचं टाकून तरुणाने शिर सोबत घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. मीना असे मृत तरुणीचे नाव आहे. (हेही वाचा -Tata Steel Executive Murder Case: टाटा स्टील कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू, गाझियाबादमधील घटना)

मुलगी SSLC परीक्षा उत्तीर्ण -

मृत तरुणी नुकतीच एसएसएलसीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. गुरुवारी आरोपीने पीडित तरुणीचा खूप केला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, एसपी के रामराजन यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी सोमवारपेठ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (वाचा - Dr. Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर दोषी; मास्टरमाईंडला अद्याप शिक्षा नाही)

लग्न मोडल्याने तरुण संतापला -

एसपी के रामराजन यांनी सांगितलं की, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना समजावून सांगितले की मुलगी 18 वर्षांची झाल्यावरच तिचे लग्न करा. त्यानंतर तिचा विवाह रद्द करण्यात आली. अहवालानुसार, अधिकारी निघून गेल्यानंतर आरोपींनी घरात घुसून तिची निर्घृण हत्या केली.