Ujjain School Wall Collapsed: मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिराजवळ असलेल्या एका शाळेची भिंत कोसळली आहे. ही घटना शुक्रवारी सांयकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भिंत कोसळल्यानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात होती. (हेही वाचा- अंधश्रद्धेचा कळस! शाळेच्या प्रगतीसाठी दोन विद्यार्थ्यांचा नरबळी; शाळा शिक्षकांसह तांत्रिक वडिलांना अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, महाकाल कॉरिडॉरच्या गेट क्रमांक ४ जवळ असलेल्या शाळेत ही घटना घडली. घटनेची तात्काळ माहिती बचावकार्याला देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांसह बचावकार्य दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु झाले. भिंत कोसळल्यामुळे अनेक जण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अधिकाऱ्यांने माध्यमांना माहिती दिली की, दोन जणांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
बचावकार्य करतानाचा व्हिडिओ
उज्जैन में महाकाल मंदिर के गेट नंबर चार के पास दीवार गिरने से दो लोगों की मृत्यु और कई लोगों के घायल होने का दुःखद समाचार प्राप्त हुआ।
ईश्वर दिवंगत आत्माओं को अपने श्री चरणों में स्थान प्रदान करें और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना है।#Ujjain #MadhyaPradesh #Mahakal… pic.twitter.com/zbNjlREueJ
— Sukhdeo Bhagat (@sukhdeobhagat) September 27, 2024
गेल्या काही दिवसांपासून उज्जैनमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याची प्राथमिक माहिती माध्यमांना मिळाली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकाल लोक कॉरिडॉरच्या गेट क्रमांक ४ जवळ असलेल्या महाराजवाडा शाळेचे नुतनीकरण सुरु असताना भिंतीचा काही भाग कोसळला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी तात्काळ बचाव कार्य सुरु झाले. त्यांनी जखमींना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात रेफर केले आहे.