Hathras Student Murder Case: अंधश्रद्धेचा कळस! शाळेच्या प्रगतीसाठी दोन विद्यार्थ्यांचा नरबळी; शाळा शिक्षकांसह तांत्रिक वडिलांना अटक

उत्तर प्रदेशमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या प्रगतीसाठी तेथे चक्क दोन लहान मुलाचा नरबळी देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरूण गेला आहे.

Hathras Student Murder Case: अंधश्रद्धेचा कळस! शाळेच्या प्रगतीसाठी दोन विद्यार्थ्यांचा नरबळी; शाळा शिक्षकांसह तांत्रिक वडिलांना अटक
Photo Credit- X

Hathras Student Murder Case: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शाळेच्या प्रगतीसाठी तेथे शाळा व्यवस्थापन आणि मुलाच्या वडिलांनी त्यांच्या मुलाचा आणि आणखी एक मुलाचा नरबळी (Black Magic) दिला. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलाच्या तांत्रिक वडिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली साहपाऊ भागातील रासगनवा गावात चालणाऱ्या डीएल पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील 11 वर्षीय कृतार्थ कुशवाह रहिवासी तुरसैन याचा गळा दाबून खून (Murder) करण्यात आला होता. (हेही वाचा: Kerala ‘Black Magic’ Case: काळ्या जादूच्या नावाखाली, पीडिताच्या शरीराचे 56 तुकडे; शरीराचे काही भाग शिजवून खाल्ले, केरळ राज्यातील धक्कादायक घटना)

या प्रकरणी पोलिस निरीक्षक सदाबाद हिमांशू माथूर यांनी सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापकाचे वडील जशोधन सिंग. दिनेश बघेल हे तांत्रिक विधी करतात. वडिलांसह शाळेच्या व्यवस्थापकाने शाळेच्या प्रगतीसाठी मुलाचा बळी देण्याचा कट आखला. गेल्या रविवारी रात्री शाळेच्या आतील हॉलमध्ये झोपलेल्या कृतार्थ या विद्यार्थ्यांचा गळा आवळून बळी देण्यात आला. यानंतर व्यवस्थापक आपल्या गाडीतून विद्यार्थ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलाचा मृतदेह शाळा व्यवस्थापकाच्या गाडीत सापडला.

मुलाच्या हत्येनंतर शाळेच्या व्यवस्थापनाने मुलाच्या घरी फोन करून कृतार्थ आजारी असल्याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय शाळेत पोहोचले असता त्यांना कृतार्थ सापडला नाही. वसतिगृह संचालक दिनेश बघेल यांना विद्यार्थ्यांच्या उपचाराबद्दल विचारले असता त्यांनी त्यांची दिशाभूल केली. कृतार्थला उपचारासाठी घेऊन गेल्याचे ते सांगत राहिले. काही वेळाने या लोकांनी दिनेश बघेलला त्याच्या कारसह सादाबादजवळ पकडले. (हेही वाचा: Kapile Maharaj Black Magic: दत्त अवतार असल्याचे सांगत रक्ताभिषेक; भोंदूबाबा कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल)

यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना कृतार्थचा मृतदेह मागच्या सीटवर पडलेला आढळून आला. यानंतर पोलिसांनी मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यात विद्यार्थ्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2024 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).