केरळसारख्या (Kerala) शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेल्या राज्यातून धक्कादायक घटनापुढे येत आहे. केवळ 'काळी जादू' (Black Magic) करण्यासाठी नरबळी दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या घटनेत लहान मुलाची हत्या करुन त्याच्या शवाचे तब्बल 56 तुकडे करण्यात आले. हे कृत्य करणारे तीन आरोपी इतके विकृत झाले की, त्यांनी या शरीराचे काही भाग शिजवून खाल्ल्यचीही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. केरळमध्ये काळ्या जादूच्या नावाखाली नरबळीचे (Kerala ‘Black Magic’ Case) एक प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर पोलिसांनी पुढच्या काही तासातच तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपशील जारी केला. आरोपींनी पीडित व्यक्तीच्या शरीराचे 56 तुकडे केल्याचे पोलिसांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी शफी याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याने एका जोडप्याला भगवल सिंग आणि त्याची पत्नी लैला यांना आपल्या जाळ्यात अडकवले पैशाच्या लोभाने नरबळी दिला.
पोलिसांनी पुढे बोलताना सांगितले की, आरोपीने नरबळी देण्यासाठी जोडप्याला कसे प्रवृत्त केले याबाबत कबुली दिली आहे. त्याचा तपशीलही पोलिसांकडे दिला आहे. दरम्यान, ज्या जोडप्याने हे कृत्य केले त्या जोडप्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Black Magic: ठाणे जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात चालू होता जादूटोणा- काळी जादूचा विधी; पोलिसांकडून आठ जणांना अटक)
पोलिसांनी सांगितले की, जीव गमावलेल्या व्यक्तीला आरोपींनी अत्यंत क्रुर पद्धतीने ठार केले. ठार केल्यानंतर पीडिताच्या शरीराचे 56 तुकडे करण्यात आले. त्यातील काही तुकडे आरोपींनी शिजवून खाल्ले. तर उर्वरीत तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पुरण्यात आले. पीडित व्यक्तीच्या गुप्तांगालाही दुखापत झाल्याचे पुढे आले आहे. आरोपींनी पीडित व्यक्तीला जीवे मारताना विकृत आनंद घेतला.
आरोपींपैकी एक असलेल्या लैला हिने कबूल केले आहे की त्यांनी (त्या तिघांनी) स्वयंपाक केल्यानंतर पीडितांच्या शरीराचा काही भाग शिजवून खाल्ला. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एका हरवलेल्या तक्रारीचा पोलिस तपास करत असताना मंगळवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांना तपासात असे आढळून आले की गूढविद्या अभ्यासक मोहम्मद शफी याने एका जोडप्याला संपत्तीचे वचन देऊन मानवी यज्ञ करण्यासाठी संभ्रमीत केले. बेपत्ता व्यक्ती हा त्यांचा दुसरा बळी होता, तर पहिला बळी जूनमध्ये मारला गेलेली महिला होती, असेही तपासात पुढे आले.