Black Magic: ठाणे जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात चालू होता जादूटोणा- काळी जादूचा विधी; पोलिसांकडून आठ जणांना अटक
Black Magic | (File Photo)

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुरबाड शहरात जादूटोणा आणि काळ्या जादूचे (Witchcraft and Black Magic) प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आठ जणांना सोमवारी अटक करण्यात आली. या प्रकरणातील एक जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड येथील टोकवडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतोष दराडे यांनी सांगितले की, रविवारी रात्री सोगाव येथे काही लोक काळी जादू व जादूटोणा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यामध्ये दोन बनावट साधू आणि दोन महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली, तर रात्रीच्या वेळी एक व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली. पोलिसांनी 26 आणि 19 वयाच्या दोन महिलांची सुटका केली, ज्या या विधीचा भाग बनणार होत्या. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी 2009 मध्ये इथे अशाच एका प्रकरणात एका बाबाना अटक करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.

अलीकडेच, महाराष्ट्रातील नागपुरात, 'वाईट शक्तींना घालवण्यासाठी' मुलीवर 'काळी जादू' करत असताना, एका पाच वर्षांच्या मुलीच्या पालकांनी तिला बेदम मारहाण केली. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. दुसरीकडे, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एका मोलकरणीला अटक केली आहे. मोलकरणीने एका वृद्ध व्यक्तीची 16 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरून फसवणूक केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा:  मुख्यमंत्र्यांचं उभारलं मंदिर, मंदिरात मुख्यमंत्र्यांची केली जाते मूर्ती पूजा)

मालकाच्या घरात कोणीतरी जादूटोणा केला असून जीवाला धोका आहे, असे सांगून आरोपी मोलकरणीने फसवणूक केली. रिपोर्टनुसार, महिलेने घराला जादूटोण्यापासून मुक्त करण्यासाठी मालकाला त्याच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले होते. यावेळी शिफ्टिंगदरम्यान आरोपी महिला सर्व मौल्यवान ऐवज घेऊन पळून गेली.