Scorpion in Burger: जयपूरमधील नामांकित हॉटेलच्या बर्गरमध्ये निघाला विंचू, पहिला घास खाताच तरूण रुग्णालयात दाखल
Burger (Photo Credit: Pixabay)

Scorpion in Burger: रस्त्यावरचे अन्न खाऊ नका, असे सांगितले जात असताना जयपूरच्या (Jaipur) एका हॉटेलमधील बर्गरमध्ये (Burger) विंचू (Scorpion) निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या बर्गरचा पहिला घास खाणाऱ्या तरूणाची प्रकृती बिघडली असून उपाचारासाठी त्याला जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच या तरूणाची प्रकृती अस्थिर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या बर्गरचे नमुने तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. मात्र अत्यंत प्रतिष्ठित आणि अलिशान हॉटेलमध्येदेखील हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

तरूण सैनी असे बर्गर खाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, तरूण हा आपल्या मित्रासोबत जयपूरमधील एका सुप्रिद्ध हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर त्यांनी दोन बर्गर ऑर्डर केले. परंतु, बर्गर खाताना तरूणला तोंडात काहीतरी विचित्र गोष्ट आल्याचे जाणवले. त्यानंतर तोडांतून खास बाहेर काढताच तरूणाला बर्गरमध्ये विंचू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तरूण आणि त्याच्या मित्राने हॉटेलच्या स्टाफला याची कल्पना दिली. तसेच यामुळे तरूण आणि हॉटेलच्या स्टाफसोबत वाद सुरु झाला. त्यानंतर तरूणची अचानक तब्येत खराब झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- Junk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, तरूण आणि त्याच्या मित्राने याबाबत हॉटेलच्या स्टाफला माहिती दिली असताना त्यांनी चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी या बर्गरचे नमुने तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. मात्र, जयपूरमधील एका नामांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.