Video Viral: दिल्लीत भररस्त्यात दुचाकीवर तरुणांची हुल्लडबाजी, Video पाहून नेटकरी संतापले
VIral Video PC TWITTER

Video Viral: दिल्लीत गुन्हेगारी प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिल्लीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तीन तरुण दुचाकीवरून जात असताना मस्ती करत आहे. एकाने दारूची बोटल तर एकाने हातात कोयता हातात घेतला आहे. एकाने मागून या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद केले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओला कंमेट केले आहे. या घटनेनंतर असे दिसून येत आहे की, पोलिसांचा तरुणांना धाक राहिलाच नाही. (हेही वाचा- कुल्लूमध्ये स्थानिक आणि परदेशी पर्यटकांनी एकत्र येऊन साजरी केली होळी

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तीन तरुण एकाच दुचाकीवरून दिल्लीच्या रस्त्यात फिरत आहे. एकाने बेधडकपणे हातात कोयता घेऊन फिरत आहे तर दुसऱ्या तरुणाच्या हातात दारूची बॉटल धरली आहे. तिघे ही दुचाकीवर गोंधळ घालत आहे. या व्हिडिओला पाहून अनेक युजर्संनी कंमेट केले आहे. ही घटना रात्री घडली आहे. पाठी मागून येणाऱ्या एका कार चालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.

व्हिडिओ पाहून एकाने कंमेट केले आहे की, दिल्लीतील तरुणांना पोलिसांची धाक उरलीच नाही. @prerna82349124 नावाच्या एक्स अकांउटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पोलिसांनी यावर लवकर कारवाई करवी अशी एकाने मागणी केली आहे.