स्थलांतरीत मजूरांना केमिकलयुक्त पाण्याने आंघोळ (PC - Twitter)

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. त्यानंतर विविध शहरात अडकलेल्या मजूरांनी गावाकडे धाव घेतली. सरकारकडून या स्थलांतरीत मजूरांना त्याचजागी थांबवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजूरांना केमिकलयुक्त पाण्याने (Chemical Water) आंघोळ (Bath) घालण्यात आली आहे. या अमानवी कृत्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सरकारचा निशेष व्यक्त केला आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये सरकारी यंत्रणाकडून स्थलांतरीत मजूरांवर केमिकलयुक्त पाण्याने फवारणी करण्यात येत आहे. यात त्यांनी आपण सर्व मिळून कोरोना विरोधात लढाई लढत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं अमानवी कृत्य करू नका. या स्थलांतरीत मजूरांनी याअगोदर खूप त्रास सहन केला आहे. त्यांच्यावर केमिकलयुक्त पाण्याने फवारणी केल्याने त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे, असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा- Coronavirus Lockdown च्या काळात अन्न, औषधे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मध्य रेल्वेच्या धावणार 3 पार्सल ट्रेन्स)

महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री जयंत पाटील यांनी प्रियंका गांधी यांनी केलेलं ट्विट रिट्विट केलं आहे. यात जयंत पाटील यांनी आपण प्रियंका गांधी यांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पाटील यांनी या अमानवी कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमधील कोरौना गावातील नागरिकांना गावाच्या नावात साधार्म्य असल्याने आमच्यासोबत भेदभाव होत असल्याचं म्हटलं होतं. तसेच मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गोरीहार येथील पोलिसांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर अमानवी कारवाई केली होती.