Parcel Train | Representational Image | (Photo Credits: ANI)

संपूर्ण विश्वाला ग्रासून टाकलेल्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट भारत देशावरही घोंगावत आहे. या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) सारखा प्रतिबंधात्मक मार्ग भारताने स्वीकारला आहे. लॉकडाऊनच्या काळात वाहतूकीच्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र अन्न आणि औषधे यांच्या वाहतूकीसाठी 3 विशष ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. या पार्सल ट्रेन्स (Parcel Trains) मुंबईतील कल्याण (Kalyan) ते पश्चिम बंगालमधील संक्राईल (Sankrail) आणि नागपूरमधील गोधनी (Godhani) ते आसाम मधील न्यू तिनसुकिया (New Tinsukia) दरम्यान धावतील. या पार्सल ट्रेन्स अन्न, औषधे यांसह जीवनावश्यक वस्तू वाहून नेणार आहेत.

लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा ठप्प असून केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी पार्सल ट्रेन्स धावणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नेहमीप्रमाणेच चालू राहील असे सांगत सरकारने नागरिकांना आश्वस्त केले आहे.

ANI Tweet:

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत देश लॉकडाऊन राहणार आहे. या काळात जीवनावश्यक सेवा वगळता सारे व्यवहार ठप्प राहणार आहेत. त्यामुळे हा काळ महत्त्वाचा असून परीक्षा पाहणार आहे. कालच 'मन की बात' या विशेष कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला दिला. सरकार आणि आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो.