पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: IANS)

हिंदूंचे सरकार अशी ओळख असलेल्या सध्याच्या सरकारने सत्तेवर येताच जुन्या, पारंपरिक, ऐतिहासिक गावांची नावे बदलण्याचा सपाटा सुरु केला आहे. सांस्कृतिक इलाहाबादचे नाव प्रयागराज झाले, फैजाबादचे अयोध्या असे नामकरण करण्यात आले. अशाप्रकारे सरकारने गेल्या वर्षभरात तब्बल 25 शहरांची नावे बदलली आहेत, आणि अजूनही अनेक गावांची नावे बदलण्याचे प्रस्ताव सरकाकडे पडून आहेत. यात आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ पुणे जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुणे जिल्ह्याचे नाव जिजापूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे.

पश्चिम बंगालचे नामांतर बांग्ला करण्यासह अनेक ठिकाणच्या नामांतराचे प्रस्ताव मोदी सरकारकडे प्रलंबित आहेत. एखाद्या राज्याचे नाव बदलायचे असेल तर संसदेत बहुमताने घटनेत बदल करावा लागतो. गृह मंत्रालयाकडून नाव बदलण्याच्या प्रस्तावाच्या मंजुरी संबंधित संस्थांबरोबर चर्चा करुन त्याप्रमाणे सूचना दिली जाते. रेल्वे मंत्रालय, डाक विभाग आणि सर्व्हे ऑफ इंडियाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर जागांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते. या सर्व प्रक्रियेनंतर सरकारने 25 गावांची नावे बदलली आहेत.

नावे बदलेली गावे –

इलाहाबाद – प्रयागराज

फैजाबाद – आयोध्या

राजामुंदरी (आंध्र प्रदेश) - राजामहेंद्रवरम

आऊटर व्हीलर (ओडीसा) - ए. पी. जे. अब्दुल कलाम आयलँड

एरिक्कोड (केरळ) – एरिकोड

पिंडारी (हरीयाणा) - पांडू

या ठिकाणांची नावेही लवकरच बदलणार –

लांडगेवाडी (सांगली, महाराष्ट्र)-  नरसिंहगांव, गढी सांपला (रोहतक, हरयाणा)- सर छोटू राम नगर, खाटू कलांगांव (नागौर, राजस्थान)- बड़ी खाटू, महगवां छक्का (पन्ना, मध्य प्रदेश)- महगवां सरकार, महगवां तिलिया (मध्य प्रदेश)- महगवां घाट, शुक्रताल खादर (मुजफ्फरपूर, उ. प्रदेश)- सुखतीर्थ खादर, शुक्रताल बांगर (उ. प्रदेश)- सुखतीर्थ बांगर.  तर नागालँडमध्ये दिमापूरमधील कछेरीगावाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला होता.