धक्कादायक! तेलंगाना मध्ये महिला पोलिसांना टीआरएस कार्यकर्त्यांची अमानुष मारहाण; देशात संतापाची लाट (Video)
Woman forest officer thrashed by a mob in Telangana (Photo Credits: ANI)

तेलंगाना (Telangana) मध्ये टीआरएसच्या (TRS) कार्यकर्त्यांचा गुंडगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांचा सहकार्याने वन विभाग कर्मचारी असिफाबाद (Asifabad)  जिल्ह्यातील सिरपूर कगज नगर येथे वृक्षारोपण करण्यासाठी गेले होते. यावेळी सत्तारूढ तेलंगाना राष्ट्र समितीचे (TRS) कार्यकर्ते आणि कर्मचारी यांच्यामध्ये छोट्या कारणावरून भांडण झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस आणि वन विभागाच्या लोकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात महिला पोलिस आणि वन विभागाचे महिला कर्मचारी जखमी झाले. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये टीआरएसचे कार्यकर्ते अमानुषरित्या महिला पोलिसांना मारताना दिसत आहेत.

शनिवारी, २९ जून रोजी ही घटना घडली आहे. घटनास्थळी जमाव आक्रमक झाल्याने पोलिस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी महिला पोलिसांनाच तेलंगाणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी काठीने मारहाण केली. या हल्ल्यात गाड्‍यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी असलेल्या ट्रॅक्टरची तोडफोड केली. महिलेला मारहाण करणारा कोनेरू कृष्णा नावाचा व्यक्ती स्थानिक आमदारचा भाऊ असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा: धक्कादायक! छेडछाडीला नकार दिल्याने आरोपींनी मारहाण करत आई-मुलीचे केले मुंडन)

दरम्यान काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश मधील भाजप आमदाराने प्रशासकीय अधिकाऱ्याला चक्क बॅटनं मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता अशाप्रकारे स्थानिक कार्यकर्त्यांचा त्रास पोलिसांनाच झालेला पाहून देशात या घटनेबाबत निषेध नोंदवला जात आहे.