हैदराबाद तसेच उन्नाव याठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच आता हरियामधील पालवालमध्ये (Haryana Palwal) एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Teenage Girl) 5 डिसेंबरला दुसऱ्यांदा सामुहिक बलात्कार (Gang Raped) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीवर ऑगस्टमध्ये सामुहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यावरून देशातील आरोपींना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. (हेही वाचा - पॉर्न साइटमुळे बलात्काराच्या घटना वाढत आहेत - मुख्यमंत्री नितीश कुमार)
ऑगस्टमध्ये 4 जणांनी या पीडितेचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. आता पुन्हा त्याच आरोपींनी तिच अपहरण करून बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. पालवाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे 4 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर या बलात्कार करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालवाल पोलिस यासंदर्भात आणखी तपास करत आहेत. (हेही वाचा - धक्कादायक! उन्नावमध्ये सामूहिक बलात्कार; पीडितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न)
मागील आठवड्यात हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेवर करून तिला जाळून टाकण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच बिहारच्या बक्सर आणि समस्तीपूरमध्ये बलात्कारानंतर पीडितेला जाळण्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. तसेच शुक्रवारी दरभंगामध्ये एका टेम्पो चालकाने 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. शुक्रवारी रात्री उन्नावमध्ये वर्षभरापूर्वी बलात्कार झालेल्या पिडीतेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. देशामध्ये वारंवार बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सरकाराने बलात्कार करणाऱ्या आरोपींसाठी कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे.