Taj Mahal Ticket Prices: ताजमहालला भेट देण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना (Tourists) आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण, आग्रा विकास प्राधिकरणाने (Agra Development Authority) ताजमहालच्या तिकिटाचे दर वाढवण्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केल्यास पर्यटकांना 1 एप्रिलपासून ताजमहाल पाहण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. सध्या भारतीय पर्यटकांसाठी (Indian Tourists) ताजमहाल पाहण्याचे तिकीट 250 रुपये आहे. तसेच विदेशी पर्यटकांना (Foreign Tourists) ताजमहाल पाहण्यासाठी 1300 रुपये द्यावे लागतात. आग्रा विभागीय आयुक्त अमित गुप्ता यांनी सोमवारी सांगितले की एडीएने ताजमहालच्या मुख्य घुमट प्रवेशासाठी 200 रुपये जास्तीचे तिकिट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या 200 रुपयांच्या व्यतिरिक्त असणार आहे. (वाचा - लवकरच Banaras Hindu University मध्ये शिकवताना दिसू शकतात Neeta Ambani; विद्यापीठाने दिला Visiting Professor बनण्याचा प्रस्ताव)
तिकिटाचे दर वाढविण्याच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त करताना सौरभ मिश्रा नावाच्या पर्यटकाने म्हटलं की, किंमती वाढल्यास भारतीय पर्यटकांना त्यांचा वारसा पाहण्यास गैरसोय होईल. मुख्य घुमट पाहण्यासाठी आम्हाला 50 रुपये मोजायचे होते, पण आता यासाठी आम्हाला 250 रुपये द्यावे लागतील. जर तिकिटांचे दर असेचं वाढत राहिले तर, ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या कमी होईल.
Taj Mahal ticket prices likely to increase for tourists. Indian tourists currently pay Rs 250; foreign tourists pay Rs 1300.
"ADA has proposed to charge Rs 200 to enter main dome, separate to Rs 200 already charged by ASI," said Agra Divisional Commissioner Amit Gupta (15.03) pic.twitter.com/eNrk9p0VGU
— ANI UP (@ANINewsUP) March 15, 2021
ताजमहालचे टूर गाईड नितीन सिंह यांनी सांगितलं की, एएसआयने आधी किंमती वाढविल्या आणि आता एडीएने प्रस्ताव तिकीट दर वाढवण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे. तसेच या प्रस्तावात पर्यटकांसाठी कोणत्याही नवीन सुविधा जोडल्या गेल्या नाहीत. एडीए फक्त कर वाढवित आहेत.