माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते चिन्मयानंद यांना बलात्कार प्रकरणी अटक
BJP leader Chinmayanand (Photo Credits: IANS)

भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) यांना शाहजहांपुर बलात्कार प्रकरणात (Shahjahanpur Rape Case) अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (UP SIT) ने चिन्मयानंद यांना शाहजहांपूर (Shahjahanpur) येथून शुक्रवारी (20 सप्टेंबर 2019) अटक केली. अटक केल्यानंतर चिन्मयानंद यांना वैद्यकीय तपासणी (Medical Examination) करण्यासाठी जिल्हा रुग्णलयात नेण्यात आले. चिन्मयानंद यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय परिसरातपोलीस दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. एसआयटी टीमही जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे.

कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. शाहजहांपूर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर चिन्मयानंद यांना आजच न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. अटक केल्यानंतर स्वामी चिन्मयानंद यांच्या वकील पूजा सिंह यांनी सांगितले की, त्यांना राहत्या घरातूनच अटक करण्यात आले आहे.

दरम्यान, एका विद्यार्थिनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणाशी संबंधीत एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात SIT टीमने स्वामी चिन्मयानंद यांची तब्बल 7 तास चौकशी केली होती. ही चौकशी पोलीस लाईन येथील एसआयटी कार्यालयात करण्यात आली होती.

प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्वामी चिन्मयानंद यांना विचारण्यात आलेले सर्व प्रश्न हे, संबंधित विद्यार्थीनी आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाशी संबंधित होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमागचे नेमके सत्य काय आहे? संबंधित विद्यार्थिनीला ते कसे ओळखतात. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांचे म्हणने काय? असे या प्रश्नांचे स्वरुप होते. तसेच, कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मिळालेल्या काही पुराव्यांवरुनही एसआयटीने स्वामी चिन्मयानंद यांना प्रश्न विचारले. (हेही वाचा, पाच बायकांनी केला बलात्कार; पतीचा जागेवर मृत्यू)

एएनआय ट्विट

दरम्यान, आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हा एक कट असल्याचा दावा स्वामी चिन्मयानंद हे या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच करत आहेत. काही लोकांना वाटते की, स्वामी चिन्मयानंद यांची प्रगती होऊ नये. त्यांनी हाती घेतलेली कामे पूर्णत्वास जाऊ नये. यासाठीच आपल्याविरोधात काही लोक कट रचत असल्याचेही स्वामी चिन्मयानंद यांनी या आधी म्हटले आहे.