पाच बायकांनी केला बलात्कार; पतीचा जागेवर मृत्यू
प्रतिकात्मक प्रतिमा

अबुजा: घटना आहे नायजेरियातील. इथे पाच महिलांनी आळीपाळीने एका व्यक्तीवर बलात्कार केला. यात त्या व्यक्तीचा जीगूच मृत्यू झाला. मृत्यू पावलेला व्यक्ती हा या महिलांचा पती आहे. त्यामुळे त्याचे आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या रागातून या सहा पत्नींनी त्याच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे.

नायजेरियातील वृत्तपत्र 'डेली पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुार, गेल्या आठवड्यात बियेनू प्रांतातील करोडपती व्यपारी युरेको ओनेजा याने एका तरुणीशी लग्न केले. हे त्याचे सहावे लग्न होते. दरम्यान, आपल्या नववधूसोबत प्रणय करत असताना त्याच्या इतर पाच पत्नी एकत्र आल्या. तसेच, त्यांनी नववधूसोबत प्रणयमग्न असलल्या पतीच्या खोलीत प्रवेश करुन त्याला धमकावण्यास सुरुवात केली.

धक्कादायक असे की, या पाचही पत्नीने ओनोजाला आपल्यासबत आत्ताच शरीरसंबंध कर अन्याथा आम्ही तुला ठार मारु अशी धमकी दिली. ओनोजाने या मागणीला विरोध केला. पण, या महिलांनी त्याला पकडून ठेवले. तसेच, पत्नींच्या ज्येष्ठतेनुसार त्याला शरीरसंबध करण्यास भाग पाडले. 'डेली पोस्ट'ने म्हटले आहे की, पाचव्या पत्नीसोबत संबंध प्रस्तापीत कर अताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ओनोजाची सहाव्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, ओनोजाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी (पाचही पत्नी) जंगलात पळ काडला. गावातील प्रमुख ओकेपे ओदोहने सांगितले की, घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आरोपी असलेल्या पाचपैकी दोन पत्नींना ताब्यात घेतले आहे.